*दलीत विद्यार्थिनीवर Radcliffe शाळेचं अत्याचार
आपले पंतप्रधान “बेटी बचाव बेटी पढाओ” म्हणत असले तरी प्रत्यक्षात भाजपच्या राजवटीत राज्य आणि केंद्र सरकारकडून त्याची अंमलबजावणी होत नाही.
फी भरण्यास उशीर झाल्याबद्दल शिक्षा म्हणून खाजगी शाळा आणि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना बेंचवर किंवा वर्गाबाहेर उभे केले म्हणून विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला दिला गेला असे आपण पाहिले आहे. खाजगी शाळा व्यवस्थापनाची ही छळवणूक त्वरित थांबली पाहिजे.
कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात मागण्यांचे निवेदन सादर केले:
1) RADCLIFFE शाळा व्यवस्थापनावर तातडीने योग्याशिर कारवाई करणे.
2) वर म्हटल्याप्रमाणे विद्यार्थ्याला वर्गात उपस्थित राहण्याची परवानगी देण्यासाठी आणि छळ थांबवण्याची थेट RADCLIFFE शाळा व्यवस्थापनाला ताबडतोब आदेश देणे.
३) आपल्या अधिकारक्षेत्रातील सर्व खाजगी शाळांना फी विलंब झाल्यावर किंवा कोणत्याही प्रकारची शुल्क भरण्यास विलंब झाल्यास विद्यार्थ्यांवर सर्व प्रकारची शिक्षा / छळ थांबवण्यासाठी परिपत्रके जारी करणे.
BRS ने पुढे SC & ST ऑर्डर्स (सुधारणा) कायदा, 1976 लागू करण्याच्या मागणीसह आणखी एक निवेदन सादर केला जेणेकरून 18.09.1976 रोजी किंवा त्यापूर्वी महाराष्ट्र राज्यात राहणार्या SC/ST ला जात प्रमाणपत्र जारी करता येईल आणि ते महाराष्ट्र राज्यातील लाभांसाठी पात्र होऊ शकतील. 18.09.1976 रोजी किंवा त्यापूर्वी महाराष्ट्र राज्यात राहणार्या DT, NT, OBC आणि SBC मधील व्यक्तींना देखील जातीचे प्रमाणपत्र जारी करणे विनंती केले आहे.