मुंबईतील गोरेगाव येथे बोनाला उत्सवात बिआरएस नेते

मुंबई 09.07.2023 : बोनाला उत्सव हा तेलुगू भाषिकांनी संपूर्ण मुंबईभर सुरू केले आहेत. रविवारी सकाळी  डोक्यावर बोनाला (नैवेद्य) घेऊन महिलांनी पश्चिम गोरेगाव यशवंत नगर येथील मुंबई तेलगू बेस्ता (कोळी) समाजाच्या मालकीच्या पोचम्मा माता देवस्थानमच्या देवस्थानाची मिरवणूक काढली. महिलांनी रेशमी साड्या नेसून, पूजेचे साहित्य, कोंबड्या, ताडी घेऊन, लहान मुलांना एका हातात धरून आनंदाने मंदिरात पोहोचून प्रार्थना केली.

तेलगू समाजाचे युवा नेते नागुला मल्लेश म्हणाले की, पोचम्मा मंदिराला चांगली प्रतिसाद मिळत आहे, याचे मुख्य कारण इतर समाजाच्या तेलुगू भाषिकांची उत्सव साजरा करण्यासाठीची उपस्थिती. हा एक जणू आकर्षणाचा भाग झाला आहे.

कार्यक्रमाला भारत राष्ट्र समिती (BRS) मुंबई कोकण विभागाचे समन्वयक  प्रा.विजय मोहिते यांनी विशेष हजेरी लावून इतर सहकारी  बिआरएस नेत्यांसह पोचम्मा मातेचा आर्शिवाद घेतला. त्यांच्या सह मुंबई उत्तर मध्य लोकसभा समन्वयक रविंद्र रोकडे, चांदिवली विधानसभा समन्वयक रमेश चौवल, चारकोप विधानसभा समन्वयक सुक्का नरसिम्हा, ठाणे शहर समन्वयक मकसूद खान, कामगार नेते संभाजी काशीद, जगत सिंग, वीरमल्ल मल्लेश आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

पोचम्मा माता देवस्थानम गोरेगाव ट्रस्टचे संस्थापक नागुला मल्लेश, मूता राजू, सदस्य एरावेना अंजय्या, गारिगे राजाराम, दिती राजू, दिती लिंगैया, रणवेणी महेंद्र, समलाक्का, उर्मिलाक्का, ललिथाक्का, शंकरवा, गंगामणी, सुजाथा, मल्ल्या, सारासाह आदी सहभागी झाले होते असे बिआरएस मुंबई प्रांथाध्यक्ष हेमंत कुमार बद्दी यांनी  सुचविले.

#Ab_ki_Baar_Kisan_Sarkar
#अब_की_बार_किसान_सरकार