महानगर पालिकेवर गुलाबी झेंडा फडकविणार ...! - प्रा. विजय मोहिते

(मुंबई) ९ जुलै २०२३ : उत्तर मध्य मुंबई लोकसभा क्षेत्राची महत्वाची बैठक कुर्ला येथे बिआरएस पार्टीचे कोकण मुंबई विभागीय समन्वयक प्रा. विजय मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुंबई उपनगर जिल्हा समन्वयक संजय निंबाळकर यांच्या प्रयत्नाने यशस्वीरित्या पार पडली.

सभेत कोकण मुंबई विभागीय समन्वयक प्रा. विजय मोहिते यांनी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षबांधणी द्वारे जास्तीत जास्त  बिआरएस पार्टीचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत आणि मुंबई महानगरपालिकेवर बिआरएस चा गुलाबी झेंडा यशस्वीरित्या फडकवता येईल असे प्रतिपादन केले.

मुंबईतील जनतेच्या स्थानिक मूलभूत गरजा भागविण्यासाठी नगरसेवक, आमदार, खासदार हे लोकप्रतिनिधी असफल होत असल्याची चिन्हे दिसताच त्यासोबतच जनतेचा लोकप्रतिनिधींच्या प्रती वाढता रोष ध्यानी घेतांच सर्वच पक्षांना महाराष्ट्राच्या जनतेचा विसर पडू लागल्याची चिन्हे या महाराष्ट्रात स्पष्टपणे दिसू लागली आहे.

इतर पक्षांची सत्तेची लालसा पाहता लोकप्रिनिधींना जनतेच्या मुलभूत समस्येबाबत  काही देणेघेणे राहिलेच नाही. अनावश्यक मुद्द्यावर लोकांना गुरफटून ठेवून खोट्या आश्वासनाच्या आधारावर सत्तेत येऊन जनतेच्या टाळूवरचे लोणी खाण्यास इतर  पक्षीय लोकप्रतिनिधी पुन्हा नव्याने सज्ज होणार हे नक्की !

महाराष्ट्रात बिआरएस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव (KCR) यांनी तेलंगाणा कृषी मॉडेलद्वारे  कल्याणकारी योजना राबविण्याचे धोरण अवलंब करताच महाराष्ट्रातला ६५% शेतकरी वर्गाला भुरळ पडली आहे. खेड्यात राबविला जाणारा विकासात्मक बिआरएस पक्षाचा अजेंडा पाहता शहरी भागात लोक जागृत होणे स्वाभाविक आहे.

जनता नवीन पर्याय शोधू पाहत असताना अचानक बिआरएस पक्षाची महाराष्ट्रात झालेली दमदार एंट्री महाराष्ट्रातील अनेक पक्षांच्या पायाखालची सरकणारी वाळू पाहता बिआरएस पार्टी विरोधी पक्षातील राजकारण्यांना कलाटणी देणारी ठरू शकते.

बिआरएस चे सरकार म्हणजेच शेतकऱ्याचे, कष्टकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे, शोषित, पिडीत, वंचित आणि कामगारांचे सरकार हे एक समीकरणच या महाराष्ट्रात निर्माण झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नवीन पर्याय म्हणून लोक पसंती देऊ लागले आहेत.  या कल्याणकारी धोरणाचा अवलंब करून विकासाचा अजेंडा घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर विरोधी पक्षांना चितपट करीत बिआरएस पार्टीचा गुलाबी झेंडा हा मुंबई महानगरपालिकेवर फडकविणार असे प्रतिपादन बिआरएस पार्टीचे कोकण मुंबई विभागीय समन्वयक प्रा. विजय मोहिते यांनी केले. या बैठकीत उत्तर मध्य मुंबई लोकसभा समन्वयक श्री. रविंद्र रोकडे, धारावी विधानसभा समन्वयक श्री. नागेला देवानंद, कुर्ला विधानसभा समन्वयक श्री. अक्षय सानप, चांदिवली विधानसभा समन्वयक श्री. रमेश चौवल, वांद्रे पश्चिम विधानसभा समन्वयक श्री. शंकर द्रविड यांनी सदर बैठकीची जबाबदारी सांभाळली. ठाणे शहरातील समन्वयक श्री. मकसुद भाई आणि त्यांचे सहकारी मंडळ, दिल्ली येथून आलेले बिआरएस पक्षाचे निरीक्षकांचे शिष्टमंडळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

 सभेत सदिच्छा भेट घेण्यासाठी सांगली जिल्ह्यतून आलेले श्री. प्रफुल्ल निकम आणि त्यांचे सहकारी, ठाणे जिल्ह्यातून आलेले शिवसेनेचे शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य श्री अतुल कदम, विलेपार्ले विधानसभा क्षेत्रातून आलेले कार्यकर्ते श्री. राधेश्याम जाधव, श्री.अजय नायर, श्री. धर्मराज गुप्ता, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चेंबुर उपशाखाध्यक्ष श्री.विजय सरोदे आणि त्यांचे सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कुर्ला विधानसभा महिला मोर्चा संघटक स्वप्नाली तनपुरे आणि त्यांचे सहकारी, वंचित बहुजन आघाडीचे श्री.नरेंद्र भांडारे आणि त्यांचे सहकारी,  शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वांद्रे पूर्व विधानसभा उपसमन्वयक श्री. आकाश तांबे आणि त्यांचे सहकारी इत्यादी मान्यवर मंडळींनी भारत राष्ट्र समिती मध्ये प्रवेश केला.
- रवींद्र रोकडे 
#Ab_ki_Baar_Kisan_Sarkar
#अब_की_बार_किसान_सरकार