के सी आर यांची महाराष्ट्रात दमदार एन्ट्री

 

सोलापूर - भारत राष्ट्र समिती (BRS) या पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री चंद्रशेखर राव उर्फ के सी आर यांनी आज महाराष्ट्रामध्ये दमदार एन्ट्री केली. चंद्रशेखर राव आज दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहे. त्यांचं अख्ख मंत्रिमंडळच महाराष्ट्रात येत आहे. चंद्रशेखर राव राज्यात मोठं शक्तीप्रदर्शन करणार असल्याने त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.आज आणि उद्या 27 जून रोजी महाराष्ट्रात राहणार आहेत. तेलंगणातून ते थेट उमरग्याला आले आहेत. त्यानंतर सोलापूरला रवाना होणार आहेत. उद्या  ते पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची पूजा करणार आहेत. यावेळी चंद्रशेखर राव विठ्ठलावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याची शक्यता आहे.

#Ab_ki_Baar_Kisan_Sarkar
#अब_की_बार_किसान_सरकार