बीआरएस महाराष्ट्रातील सर्व निवडणुकांसाठी सज्ज

 


बीआरएसच्या प्रथम सभेमध्ये मुंबईच्या नेत्यांनी घोषणा केली

शनिवार 15 ऑक्टोबर 2022 रोजी भारत राष्ट्र समिती (भारसा किंवा बीआरएस) ची प्रथम बैठक ट्रायडेंट हायस्कूल, कांदिवली, मुंबई येथे हेमंतकुमार बद्दी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

 सभेच्या सुरुवातीला, नवीन संसद भवनाला भारतरत्न डॉ. आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव तेलंगणाचे विधानसभेमध्ये मंजूर केल्याबद्दल आणि तेलंगण सचिवालयाचे नाव बाबासाहेबांच्या नावावर ठेवल्याबद्दल तेलुगू  मुंबईकरांनी बीआरएसचे प्रमुख व तेलंगणाचे मुख्यमंत्री मा. श्री.  केसीआर यांचे आभार मानले.

बीआरएस चे मुंबई प्रांथाध्यक्ष हेमंतकुमार बद्दी म्हणाले की, निजामाबाद जिल्ह्यातील तेलंगणाचे सुपुत्र मा. श्री. सयाजी सीलम यांची महाराष्ट्र विधानसभेचे प्रथम सभापती (स्पीकर) म्हणून निवड झाली होती आणि दुसरे तेनुगु/मुदिराज पुत्र पुप्पला नरसिंह हे 1954 मध्ये मुंबईचे महापौर होते. याशिवाय मुंबई महापालिकेत अनेक तेलुगू व्यक्ती नगरसेवक होते. मात्र, 1970 नंतर महाराष्ट्रातील काँग्रेस भाजप पक्षांनी तेलुगू लोकांना निवडणूक लढवण्यासाठी तिकीट देणे बंद केले. पण आता तेलुगू मुंबईकरांनी दु:खी होण्याची गरज नाही, आता मा. श्री.  केसीआर साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला महाराष्ट्र राज्यातील इतर सर्वांसह महाराष्ट्र राज्यातील सर्व निवडणुका लढण्यासाठी तिकीट मिळू शकते. बीआरएस फक्त तेलुगु लोकांपुरते मर्यादित राहणार नाही, महाराष्ट्र आणि इतर राज्यातील लोकांनी बीआरएस मध्ये सामील होणे आवश्यक आहे.

पुढे म्हणाले की, इतर राज्यांमधून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेले अनुसूचित जातींसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती सुधारणा आदेश 1976 आपल्या पद्मशाली व मुन्नरु कापू साठी एसबीसी आरक्षण अंमलबजावणी करण्यात काँग्रेस आणि भाजप राज्य सरकारे अपयशी ठरली आहेत. हे अधिकार मिळविण्यासाठी, आपल्या सर्वांना बीआरएसमध्ये सामील होऊन  आंदोलन/संघर्षासाठी तयार राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याच बैठकीत बीआरएस मुंबईचे नेते सुक्का नरसिम्हा यांनीकांदिवली शाखासुरू करण्याची घोषणा केली. लवकरच समिती स्थापन करून पक्षाच्या मान्यतेने घोषणा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 पुढील महिन्यात महालक्ष्मी, मुलुंड, चेंबूर, वाशी, कळवा, ठाणे व इतर भागात शाखांची बैठक घेऊन कार्यकारिणीच्या प्रस्ताव पक्षाकडे पाठवून मंजुरीनंतर घोषणा करणार असल्याचे दुसरे नेते सुरेश मुदिराज यांनी सांगितले

या बीआरएस मुंबईच्या प्रथम सभेत कत्तेरा रामुलू महाराज, कोंडापुरम बाबू महाराज, सिंगपंगा मुथय्या महाराज, एम. दास गौड, सुक्का अशोक महाराज व इतर सहभागी झाले होते.